“हिरवा मटार करील जुनाट रोगांना दूर” असं म्हटलं जातं. पण कसं ते फार कुणाला माहिती नसतं. आज आपण बघणार आहोत कि हा हिरवा मटार नियमित खाण्यामुळे तुमच्या शरीरातील जुनाट रोग तुमच्या पासून कसे दूर राहतात. त्याचबरोबर हिरवा मटार खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत ज्याची तुम्हाला कदाचित फारशी माहिती नसेल. हिरवा मटार हि फक्त एक भाजी म्हणून आपण ओळखतो. मात्र, या हिरव्या मटारचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात ज्याच्याबद्दल फार कुणाला माहिती नसते किंवा त्याविषयी कुणी फारसं बोलताना दिसत नाही. थंडीचे दिवस सुरु झाले कि हवेमध्ये जसा प्रचंड गारठा वाढतो त्याचबरोबर भाजी मार्केट मध्ये सगळीकडे हिरव्यागार मटारच्या शेंगांनी बाजार फुलून जातो आणि सध्या मटारचा सिझन असल्याने हळूहळू मटाराच्या हिरव्यागार शेंगांनी बाजार फुलून जायला सुरुवात झाली आहे. हिरव्या मटारा चे दाणे चवीला गोड तर असतातच पण खूप पौष्टिक सुद्धा असतात. हिरव्या मटारामध्ये प्रथिने, फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स यासह अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. काही संशोधनात असही दिसून आलं आहे की मटार नियमित ख...