पद्मासन हे सिद्धासनानंतर किंवा नेहमीच्या इतर आसनांचा अभ्यास करायच्या आधी करायचे आसन आहे. या लेखामध्ये आपण पद्मासनाचे फायदे अणि हे आसन करायची योग्य पद्धत याची माहिती घेऊयात. पद्मासन हे मुख्यत्वे पायाची स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. पाय हे हालचालीचे मुख्य साधन आहे. या आसनाचा उपयोग ध्यानधारणा करायला सुद्धा केला जातो. पद्मासनात बसल्यावर पायांची स्थिती कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसते म्हणून त्याला पद्मासन (पद्म म्हणजे कमळ) म्हणतात. पद्मासन विधी सर्वप्रथम जमिनीवर अथवा आसनावर बसावे. दोन्ही पाय शरीरासमोर सरळ ठेवावे. उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेऊन डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. सिद्धासनाप्रमाणे बाकीचे शरीर ताठ ठेवून दृष्टी समोर ठेवावी. दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवून हाताचा अंगठा आणि पहिले बोट एकमेकांशी जुळवून बाकीची बोटे सरळ ठेवावीत. हे आसन दुसऱ्या बाजूनेही करावे (म्हणजे आधी डा...