Skip to main content

पद्मासन विधी आणि फायदे मराठी मध्ये

पद्मासन हे सिद्धासनानंतर किंवा नेहमीच्या इतर आसनांचा अभ्यास करायच्या आधी करायचे आसन आहे. या लेखामध्ये आपण पद्मासनाचे फायदे अणि हे आसन करायची योग्य पद्धत याची माहिती घेऊयात.

पद्मासन हे मुख्यत्वे पायाची स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. पाय हे हालचालीचे मुख्य साधन आहे. या आसनाचा उपयोग ध्यानधारणा  करायला सुद्धा केला जातो. पद्मासनात बसल्यावर पायांची स्थिती कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसते म्हणून त्याला पद्मासन (पद्म म्हणजे कमळ) म्हणतात.

पद्मासन विधी

  • सर्वप्रथम जमिनीवर अथवा आसनावर बसावे.
  • दोन्ही पाय शरीरासमोर सरळ ठेवावे.
  • उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेऊन डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.
  • सिद्धासनाप्रमाणे बाकीचे शरीर ताठ ठेवून दृष्टी समोर ठेवावी.
  • दोन्ही हात गुडघ्यावर सरळ ठेवून हाताचा अंगठा आणि पहिले बोट एकमेकांशी जुळवून बाकीची बोटे सरळ ठेवावीत.
  • हे आसन दुसऱ्या बाजूनेही करावे (म्हणजे आधी डावा पाय उजव्या मांडीवर आणि मग उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवून आसन करावे)

(संदर्भ - चित्रात दिल्याप्रमाणे )

पद्मासन केव्हा आणि किती वेळ करावे

  • पद्मासन सिद्धासनानंतर किंवा नित्याच्या इतर आसनांचा अभ्यास करायच्या आधी करायचे आसन आहे.
  • सुरुवातीस हे आसन जरा अवघड वाटते म्हणून ५ ते १० सेकंदापासून सुरुवात करुन हळूहळू वेळ वाढवत न्यावा.
  • या आसनावर देखील ५ ते १० मिनिटे किंवा त्याहून  अधिक वेळ बसायला हरकत नाही.

पद्मासन टीप

  • आसन करतांना कुठल्याही प्रकारचा त्रास वाटल्यास आसन करणे थांबवावे.
  • कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असतांना हे आसन करणे टाळावे किंवा तज्ञ माणसाचा सल्ला घ्यावा. 

पद्मासन फायदे

  • पायांची शक्ती वाढवण्यासाठी या आसनाचा अतिशय उपयोग होतो.
  • विविध अशा हालचालीनी, श्रमामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे पायाला गोळे येणे, पाय वळणे, शिरा ठणकणे, लचकणे इत्यादि विकार पायाला होतात. याची मुख्य दोन कारणे श्रम आणि पायांचा कमकुवतपणा. या आसनाच्या नियमित अभ्यासामुळे ही दोन्ही कारणे नष्ट होतात.
  • सायटिका नावाच्या रोगावर देखील या आसनाचा चांगला उपयोग होतो असे दिसून आले आहे.
  • तसेच बैठका मारणे, उड्या मारणे, धावणे या प्रकारच्या व्यायामाने उत्पन्न होणारे दोष सुद्धा या आसनाने नष्ट होतात असाही अनुभव आहे.

तेव्हा पद्मासनाची विधी आणि फायदे आपण या लेखात बघितले. वर दिलेली माहिती नीट वाचून त्याचा अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्ण लाभ घेता येईल. 

Comments

Popular posts from this blog

सिद्धासन माहिती आणि फायदे मराठी मध्ये 

मनाची एकाग्रता ही बुद्धीचं काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाची असते. विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी किंवा असं कुठलाही काम ज्यात अतिशय एकाग्र होण्याची गरज लागते अशा सर्व लोकांसाठी सिद्धासन हे अतिशय उपयुक्त आणि सोपं आसन आहे. योगाभ्यास करण्यासाठी सुद्धा मनाची एकाग्रता लागते म्हणूनच इतर सर्व आसनांच्या आधी हे आसन केलं जातं ज्यामुळे पुढील आसनांचा अभ्यास एकाग्रतेने होऊ शकेल. सिद्धासन म्हणजे काय? सिद्धासन म्हणजे सिद्ध लोकांचे आसन किंवा आसनांचा अभ्यास करायला सिद्ध करणारे आसन. या आसनाचा नियमित अभ्यास करणाऱ्यां लोकांमध्ये आपल्या मनावर खूप चांगल्या प्रकारे ताबा ठेवण्याची क्षमता असते. ज्यांना एखादी सिद्धी मिळवायची आहे म्हणजे एखादं ध्येय गाठायचं आहे अशा लोकांसाठी सिद्धासन हे अतिशय उपयोगी आहे. सिद्धासन हे मुख्यत्वे मानसिक एकाग्रतेसाठी उपयोगी पडते. तसेच कुठल्याही प्रकारचे श्वसनाचे व्यायाम अथवा ध्यान करताना सर्वात सहज अणि सोपे आसन म्हणून याचा निश्चित उपयोग होतो. माणसाच्या मनाचे शत्रु समजले जातात ते षडरिपु म्हणजे ...

Pranasana - Steps and Benefits

You might like our post How to do Shalabhasan or Grasshopper pose Pranasana Steps - Sit upright on the ground and relax yourself. Now, keep your legs straight in front of you. Bend the left knee and keep the left foot on the right thigh. Bend the right knee bringing the sole of the right foot to the ground in line with the left knee. Now, try to keep right arm on some distance (as much as possible) from the body but that arm should be below the right knee. Keep left arm near the body for support. This is Pranasana. This should be done from other side also to keep the balance of the exercise. Precautions to take before doing Pranasana - Do this asana with an empty stomach. Don’t eat anything 3-4 hours before doing this asana. Don’t do it forcefully. Do it, till you fill comfortable otherwise it will harm you. Take doctors advice before starting to do this asana. Weak people should do it very carefully. Do this pose in the morning. Beginner – Do it for 5-6 seconds ...

Gomukhasana or Cow Face Pose - Steps and Benefits

Indian Yoga has many asanas/poses which gives really unpredictable but positive results. This is another next level of asana or a position. When we complete the position of Gomukhasana, it looks like a Cow Face, so that it is called Gomukhasana or Cow Face Pose. You might like our post How to do Ardha Matsyendrasan or Half Spinal Twist Pose Steps of Gomukhasana or Cow Face Pose - Sit on the ground with stretched legs in front of you. Keep your back strait and erect. Now slowly bend your left leg, and place it under your right buttock. Then bend your right leg and place it over your left thigh. Keep your both knees close together as they are stacked one on top of the other. Now, slowly fold your left arm and place it behind your back. Take your right arm over your right shoulder, and stretch it as much as you can until it holds your left hand. Initially, it will be little difficult to do this. But after some days of practise, you will be able to do it. Keep the trunk...