“तुम्ही रोज BP ची औषधं घेताय… तरीही BP control होत नाही? 😳
किंवा अचानक
BP खूप वाढतं?
मग आजचा हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे — कारण आज आपण
बघणार आहोत, त्या 10 चुका, ज्या 90% लोक अपुऱ्या माहितीमुळे करतात!”
१) मीठ (Sodium Intake)
बर्याच लोकांना वाटतं की त्यांनी जेवणात मीठ कमी केलं म्हणजे BP control होईल. पण प्रत्यक्षात hidden sodium हा सगळ्यात मोठा problem असतो.
चिप्स, फरसाण किंवा चिवडा, पापड, लोणची, सॉस, instant noodles, बेकरीमध्ये तयार केलेले पदार्थ या सर्व पदार्थांमध्ये सोडिअम खूप जास्त असतो. हा सोडिअम शरीरात पाणी धरून ठेवतो (water retention), ज्यामुळे blood volume वाढतो. जेव्हा blood volume वाढतो, तेव्हा blood vessels वर pressure वाढतो आणि BP वाढतो.
यातील मोठी चूक म्हणजे लोक औषध घेतात पण आहार बदलत नाहीत. त्यामुळे औषधांचा चा प्रभाव कमी होतो.
यावर उपाय म्हणजे
- processed food टाळा,
- कमी सोडिअम असलेला आहार घ्या आणि
- घरगुती अन्नावर भर द्या.
२) तणाव आणि हार्मोन्स (Stress आणि Cortisol Hormone)
तणाव हा BP वाढण्यामागचा अदृश्य पण खूप शक्तिशाली घटक आहे. जेव्हा तुम्ही सतत तणावात असता, तुम्हाला कामाचा ताण, आर्थिक चिंता, वैयक्तिक समस्या असतात त्यामुळे शरीर cortisol आणि adrenaline hormones release करतं. हे हॉर्मोन्स रक्तवाहिन्या अरुंद करतात आणि हृदयाची गती वाढवतात.
यामुळे BP अचानक वाढतं आणि control होत नाही. बर्याच वेळा लोक औषध घेतात पण stress control करत नाहीत — त्यामुळे BP stable राहत नाही.
यावर उपाय म्हणजे
- ध्यान, योग, प्राणायाम यांचा रोज सराव करा.
- भावनिक आरोग्य टिकवा (Emotional health maintain) करणं
हे BP control साठी खूप महत्त्वाचं आहे.
३) वजन वाढणे / लठ्ठपणा (Weight Gain / Obesity)
जास्त वजन किंवा लठ्ठपणा हे BP वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. शरीरात fats वाढल्याने रक्तवाहिन्यांवर वर ताण येतो आणि हृदयाला ला रक्तप्रवाहात जास्त मेहनत घ्यावी लागते. विशेषतः पोटाची चरबी BP साठी खूप घातक असते.
लठ्ठपणामुळे जळजळ वाढते, कोलेस्टेरॉलचं असंतुलन होतं आणि चयापचय क्रिया मंदावते - हे घटक बीपी वाढवतात.
यावर उपाय म्हणजे
- हळूहळू वजन कमी करा.
- क्रॅश आहार घेणे. (क्रॅश डाएट ही एक कठोर, अल्पकालीन आहार पद्धत आहे, जी कॅलरीजवर (बहुतेकदा दिवसाला ८००-१२०० पेक्षा कमी) कठोर निर्बंध घालून, जेवण वगळून किंवा काही अन्नगट वगळून झटपट वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते. ही पद्धत दीर्घकाळ टिकणारी नाही आणि त्यामुळे स्नायूंचा ऱ्हास, पोषक तत्वांची कमतरता आणि चयापचय क्रियेचे नुकसान यांसारखे धोके संभवतात)
- संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा.
४) शारीरिक हालचाल कमी असणं (Physical Inactivity)
आजकाल बैठी जीवनशैली खूप वाढली आहे. दिवसभर बसून काम करणं, व्यायाम किंवा शारीरिक हालचाली न करणं — यामुळे स्नायू अकार्यक्षम राहतात आणि रक्तप्रवाह मंदावतो.
जेव्हा रक्तप्रवाह योग्य प्रमाणात होत नसतो, तेव्हा रक्तवाहिन्या कडक होतात आणि BP वाढतो.
याउलट, व्यायाम किंवा शारीरिक हालचाली केल्यावर रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि BP control होतो.
यावर उपाय म्हणजे
- दररोज किमान 30–45 मिनिटं चालण्याचा व्यायाम करा
- सक्रिय जीवनशैली ठेवा.
५) अपूर्ण झोप (Poor Sleep)
झोपेचा BP वर थेट परिणाम होतो. जर तुम्ही ८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर sympathetic nervous system active राहते आणि BP वाढतं.
झोप कमी होण्यामुळे
- ताणतणाव वाढवणारी संप्रेरके वाढतात
- शरीराला आराम मिळत नाही.
- रक्तदाब नियंत्रण करणे
यावर उपाय म्हणजे
- 7-8 तास गाढ झोप घ्या,
- स्क्रीन टाइम कमी करा आणि
- झोपेचा रूटीन फिक्स करा.
६) औषध घेण्याची चुकीची पद्धत
बर्याच लोकांची मोठी चूक म्हणजे ते औषध योग्य पद्धतीने घेत नाहीत. काही वेळा औषध घेणं टाळतात, काही स्वतःहून औषधं बदलतात किंवा औषधाच्या वेळा पाळत नाहीत.
BP ची औषधं योग्य वेळी आणि नियमितपणे घेतल्यास काम करतात. जर तुम्ही अनियमितपणे औषधं घेत असाल, तर BP control होणार नाही.
यावर उपाय म्हणजे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही बदल करू नका
- BP नियमितपणे तपासा.
७) मद्यपान आणि धूम्रपान
मद्यपान आणि धूम्रपान हे BP साठी खूप घातक आहेत. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि BP वाढतो. मद्यपानामुळे मुळे BP कमी जास्त होतो आणि अशी परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास हृदय खराब होऊ शकतं.
यावर उपाय म्हणजे
- धूम्रपान (smoking) पूर्णपणे बंद करा
- मध्यपान नियंत्रित करा.
८) किडनीच्या समस्या
किडनी BP control करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर किडनी खराब असेल, तर fluid balance disturb होतो आणि BP वाढतो.
👉 Diabetes आणि BP असणाऱ्या लोकांमध्ये किडनीच्या समस्या सामान्य असतात.
यावर उपाय म्हणजे
- नियमित रक्त तपासणी
- kidney function check करा.
९) चहा/कॉफी जास्त (Caffeine Intake)
जास्त चहा/कॉफी पिण्यामुळे BP तात्पुरतं वाढतं. चहा/कॉफी मज्जासंस्था उत्तेजित करतात आणि हृदयाची गती वाढवतात.
जर तुम्ही दिवसाला 4–5 कप चहा/कॉफी घेत असाल, तर BP control होणं कठीण होऊ शकतं.
यावर उपाय म्हणजे
- चहा/कॉफी कमी प्रमाणात प्
- त्याऐवजी त्याचे आरोग्यदायी पर्याय वापरा
१०) Hormonal Imbalance
हार्मोनल असंतुलन जसे थायरॉईडची समस्या किंवा अड्रेनल ग्रंथीच्या समस्या BP वर परिणाम करतात. हे हॉर्मोन्स रक्तदाब नियंत्रित करतात.
मात्र त्यांचं नियंत्रण सुटलं तर BP control होत नाही, जरी तुम्ही औषध घेत असाल तरी.
यावर उपाय म्हणजे
- blood test करून घ्या
- योग्य treatment घ्या.
“मंडळी, BP control फक्त औषधांवर नाही — लाइफस्टाइल वर पण अवलंबून आहे!
त्यामुळे आत्ता सांगितलेल्या या 10 चुका टाळा आणि निरोगी दिनचर्या follow करा
आणि BP नैसर्गिकरीत्या control करा

0 Comments