Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे

आज आपण मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात मत्स्यासन म्हणजे काय? हे आसन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे इत्यादी माहिती घेणार आहोत. मत्स्यासन म्हणजे काय? मत्स्यासन हे सर्वांगासनाच्या बरोबर उलट स्थिती असलेले आसन आहे. सर्वांगासनामध्ये आपल्याला पाठ आणि मानेवर ताण येतो. मत्स्यासनामध्ये आपल्याला वरच्या आणि खालच्या ओटीपोटावर, गळ्यावर, मांडीची पुढची बाजू इत्यादींवर ताण येतो. म्हणूनच, सर्वांगासन करून झाल्यानंतर हे आसन करावे. आता आपण सर्वप्रथम मत्स्यासन करण्यासाठीच्या पायऱ्या आणि मग त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. पण मत्स्यासन सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आधी पद्मासन सिद्ध करावे लागेल म्हणजे पद्मासनाचा चांगला अभ्यास करावा लागेल आणि पद्मासन नीट जमायला लागले कि मगच मत्स्यासन करणे सोपे जाईल. कारण मत्स्यासन करण्याची पहिली पायरी पद्मासन आहे. काही जण पद्मासनाऐवजी सिद्धासन किंवा सुखासन करतात पण या दोन पैकी कुठल्याही आसनस्थितीत मत्स्यासन केल्यास मत्स्यासनाच्या स्थितीत पाय सुटण्याची शक्यता असते. म्हणून पद्मासनच करणे योग्य आहे. तसंच हे आसन अंगात पुरेसा लवचिकपणा आणि ताकद असलेल्यांनी

बद्धकोष्ठता दूर करा सर्वांगासनाने

हल्ली अनेक जणांना थायरॉईड चा त्रास होताना दिसतो. यावर उपाय म्हणून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतात. ज्याचे अनेक दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होताना दिसतात. मात्र, थायरॉईड चा त्रास घरच्या घरी ठीक करायचा असल्यास त्यावर सर्वांगासन हा अतिशय उत्तम पर्याय आहे. सर्वांगासनाच्या नियमित अभ्यासाने थायरॉईड चा त्रास घरच्या घरी नैसर्गिक रित्या तसंच कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्या शिवाय बरा करता येतो. बद्धकोष्ठता हा सुद्धा माणसाच्या आयुष्यात हल्ली एक खूप मोठा त्रास मानला जातो. मात्र, बद्धकोष्ठतेवर अतिशय चांगला उपाय म्हणून सुद्धा सर्वांगासन या आसनाचा तुम्ही नियमित सराव करू शकता . याच बरोबर सर्वांगासनामुळे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे होतात. आज आपण बद्धकोष्ठता दूर करा सर्वांगासनाने या लेखात सर्वांगासन म्हणजे काय? हे आसन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे इत्यादी माहिती घेणार आहोत. तसंच हे आसन करताना काय काय खबरदारी घ्यावी आणि हे आसन कधी आणि किती वेळ करावे ही माहिती सुद्धा घेणार आहोत. सर्वा

पश्चिमोत्तानासन काय आहे?

आज आपण पश्चिमोत्तानासन काय आहे? या लेखात पश्चिमोत्तानासन या आसनाची माहिती घेणार आहोत ज्यामधे आपण बघणार आहोत या आसनाची माहिती, हे आसन करायची योग्य पद्धत किंवा विधी आणि या आसनाचे फायदे. पश्चिमोत्तानासन काय आहे? पश्चिमोत्तानासन या आसनात जमिनीवर बसून तुमचे पाय लांब करून आणि समोर वाकून तुमच्या गुडघ्यांना तुमच्या डोक्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातो. या आसनस्थितीवर सिद्धता मिळविण्यासाठी हे आसन वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात, समोरच्या दिशेने स्वत: ला वाकवणे देखील खूप कठीण आहे. या आसनावर सिद्धता मिळविण्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच हे आसन करत असाल तर त्यात पारंगत होण्यासाठी कृपया खाली दिलेल्या पश्चिमोत्तानासन पद्धतीचा अवलंब करा. मात्र अंतिम स्थिती थेट करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकते. पश्चिमोत्तानासनाचा अर्थ हिंदू धर्मात, प्रत्येक दिवसाची सुरुवात भगवान सूर्याची प्रार्थना करून होते. म्हणून हिंदू लोक सगळे धार्मिक विधी पूर्व दिशेला अनुसरून करतात. पश्चिमोत्तानासन म्हणजे जमि

शीर्षासन मराठी - माहिती आणि फायदे

आज आपण शीर्षासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात शीर्षासन या आसनाची माहिती घेणार आहोत ज्यामधे आपण बघणार आहोत या आसनाची माहिती, हे आसन करायची योग्य पद्धत किंवा विधी आणि या आसनाचे फायदे. शीर्षासन म्हणजे काय? शीर्षासन म्हणजे तुमच्या हातांच्या मदतीने तुमच्या डोक्यावर संपूर्ण शरीर संतुलित करणे आणि असे करताना तुमचे दोन्ही पाय वरच्या दिशेने नेणे. ही स्थिती आपल्या पायावर उभे राहण्याच्या अगदी उलट आहे. याला खाली डोके वर पाय असेही म्हणतात. या आसनाची अचूक स्थिती खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसते. हे एक खूप महत्त्वाचे आसन आहे जे दररोज केले पाहिजे. आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेले अनेक फायदे शीर्षासनामुळे आपल्याला मिळू शकतात. सुरुवातीला शीर्षासन साध्य करणे थोडे कठीण दिसते. परंतु जर तुम्ही दररोज योग्य प्रकारे हळूहळू त्याचा सराव केलात तर तुम्ही लवकरच ते व्यवस्थितपणे करू शकाल. पण ते साध्य करण्यासाठी घाई करू नका कारण शीर्षासनाच्या या स्थितीत संपूर्ण शरीराचे संतुलन फक्त डोके आणि दोन्ही हातांवर ठेवावे लागते. थोडक्यात खाली डोकं वर पाय

हलासन मराठी - माहिती आणि फायदे

आज आपण या लेखात हलासन या आसनाची माहिती घेणार आहोत ज्यामधे आपण बघणार आहोत या आसनाची माहिती, हे आसन करायची योग्य पद्धत किंवा विधी आणि या आसनाचे फायदे. हलासन म्हणजे काय? योगाभ्यासात जी अनेक आसने आहेत त्यापैकी हलासन हे एक आसन आहे. या आसनात आपल्या शरीराची स्थिती शेतकऱ्याच्या नांगरासारखी दिसते म्हणून त्याला हल (म्हणजे नांगर ) आसन असे म्हणतात. हे आसन वेगवेगळ्या स्टेप्समध्ये करता येऊ शकते. आज आपण हलासनच्या स्टेप्स आणि फायदे जाणून घेणार आहोत. हलासन स्टेप्स (नांगराची मुद्रा) हलासन सिद्ध करण्यासाठी खालील स्टेप्स कराव्या लागतील - प्राथमिक स्थिती सर्वप्रथम, शरीर आणि पाय ताणून पाठीवर झोपा (ही पहिली पायरी आहे). आता, हात जमिनीवर, सरळ आणि आपल्या पायांना समांतर स्थितीत ठेवा. शरीर पूर्णपणे सैल सोडा. त्यानंतर, तुमचे पाय गुडघ्यात वाकवा. हळूहळू तळपाय वर करा. पहिल्याच प्रयत्नात ते अवघड असल्याने हळूहळू पाय वर करा. या स्थितीत ५ सेकंद थांबा. एवढं केल्यावर पायांना रग लागते. त्यामुळे पाय पुन्हा हळूहळू खाली घेऊन आधी पाया