Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं?

साधारणपणे उन्हाळा सुरु झाला कि बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. याच प्रमुख कारण म्हणजे हवेतील उष्णता एकदम वाढायला सुरुवात होते. त्यामुळे साहजिकच आपल्या शरीरातील उष्णता सुद्धा वाढायला सुरुवात होते. आणि आपल्या शरीरातील उष्णता वाढली कि त्याचे अनेक त्रास व्हायला सुरुवात होते. पण मग ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत जे आज आपण या लेखामध्ये अगदी सविस्तर बघणार आहोत. हे अगदी सोपे आणि घरगुती उपाय आहेत जे आपण सहजपणे करू शकतो. आधी आपण बघूया शरीरात उष्णता का वाढते? मग बघूया शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं? आणि मग बघूया उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं? शरीरात उष्णता का वाढते? शरीरात उष्णता वाढण्याची अनेक कारणं आहेत. बाहेरची हवा उष्ण असते त्या हवेच्या प्रभावामुळे आपल्या शरीरात सुद्धा उष्णता वाढते. उन्हाळ्यात आपल्याला सारखा घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. आणि ती पातळी पुन्हा भरून निघाली