आज आपण मत्स्यासन मराठी - माहिती आणि फायदे या लेखात मत्स्यासन म्हणजे काय? हे आसन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे इत्यादी माहिती घेणार आहोत. मत्स्यासन म्हणजे काय? मत्स्यासन हे सर्वांगासनाच्या बरोबर उलट स्थिती असलेले आसन आहे. सर्वांगासनामध्ये आपल्याला पाठ आणि मानेवर ताण येतो. मत्स्यासनामध्ये आपल्याला वरच्या आणि खालच्या ओटीपोटावर, गळ्यावर, मांडीची पुढची बाजू इत्यादींवर ताण येतो. म्हणूनच, सर्वांगासन करून झाल्यानंतर हे आसन करावे. आता आपण सर्वप्रथम मत्स्यासन करण्यासाठीच्या पायऱ्या आणि मग त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. पण मत्स्यासन सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आधी पद्मासन सिद्ध करावे लागेल म्हणजे पद्मासनाचा चांगला अभ्यास करावा लागेल आणि पद्मासन नीट जमायला लागले कि मगच मत्स्यासन करणे सोपे जाईल. कारण मत्स्यासन करण्याची पहिली पायरी पद्मासन आहे. काही जण पद्मासनाऐवजी सिद्धासन किंवा सुखासन करतात पण या दोन पैकी कुठल्याही आसनस्थितीत मत्स्यासन केल्यास मत्स्यासनाच्या स्थितीत पाय सुटण्याची शक्यता असते. म्हणून पद्मासनच करणे योग्य आहे. तसंच हे आसन अंगात पुरेसा लवचिकपणा आणि ताकद असलेल्यांनी...