आज आपण या लेखात हलासन या आसनाची माहिती घेणार आहोत ज्यामधे आपण बघणार आहोत या आसनाची माहिती, हे आसन करायची योग्य पद्धत किंवा विधी आणि या आसनाचे फायदे.
हलासन म्हणजे काय?
योगाभ्यासात जी अनेक आसने आहेत त्यापैकी हलासन हे एक आसन आहे. या आसनात आपल्या शरीराची स्थिती शेतकऱ्याच्या नांगरासारखी दिसते म्हणून त्याला हल (म्हणजे नांगर) आसन असे म्हणतात. हे आसन वेगवेगळ्या स्टेप्समध्ये करता येऊ शकते. आज आपण हलासनच्या स्टेप्स आणि फायदे जाणून घेणार आहोत.
हलासन स्टेप्स (नांगराची मुद्रा)
हलासन सिद्ध करण्यासाठी खालील स्टेप्स कराव्या लागतील -
प्राथमिक स्थिती
- सर्वप्रथम, शरीर आणि पाय ताणून पाठीवर झोपा (ही पहिली पायरी आहे).
- आता, हात जमिनीवर, सरळ आणि आपल्या पायांना समांतर स्थितीत ठेवा. शरीर पूर्णपणे सैल सोडा.
- त्यानंतर, तुमचे पाय गुडघ्यात वाकवा. हळूहळू तळपाय वर करा. पहिल्याच प्रयत्नात ते अवघड असल्याने हळूहळू पाय वर करा.
- या स्थितीत ५ सेकंद थांबा.
एवढं केल्यावर पायांना रग लागते. त्यामुळे पाय पुन्हा हळूहळू खाली घेऊन आधी पायाची पावले जमिनीवर टेकवा म्हणजे पाय गुडघ्यात दुमडले जातात. मग हळूहळू पाय संपूर्णपणे जमिनीवर पसरवा. ही स्थिती सुरुवातीचे काही दिवस करा.
या स्थितीची सवय झाल्यावर मग पुढची स्थिती करण्याचा प्रयत्न करा.
स्थिती दुसरी
पहिली स्थिती अगदी सहजपणे करता येऊ लागल्यावर ही स्थिती करण्याचा प्रयत्न करा.
- सर्वप्रथम, शरीर आणि पाय ताणून पाठीवर झोपा (ही पहिली पायरी आहे).
- आता, हात जमिनीवर, सरळ आणि आपल्या पायांना समांतर स्थितीत ठेवा. शरीर पूर्णपणे सैल सोडा.
- त्यानंतर, तुमचे पाय गुडघ्यात वाकवा. हळूहळू तळपाय वर करा. पहिल्याच प्रयत्नात ते अवघड असल्याने हळूहळू पाय वर करा.
- आता तुमची कंबर वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपोआप तुमचे पाय तुमच्या डोक्याकडे ढकलले जातील. सुरुवातीला हे अवघड जातं म्हणून कंबर उचलण्यासाठी आपल्या हातांची मदत घ्या.
- एकदा तुम्ही तुमची कंबर पूर्णपणे उचलली आणि वाकवली की तुमचे पाय तुमच्या डोक्याच्या जवळपास असतील.
- या स्थितीत ५ सेकंद थांबा.
एवढं केल्यावर पायांना, मानेला, पाठीच्या कण्याला रग लागते. त्यामुळे जेवढा ताण शरीराला सहन होईल तेवढंच या स्थितीत रहा. जास्त जोर लावल्यास कुठेतरी लचक भरण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सहजपणे जमेल तेवढंच स्थितीत रहा.
आता आधी कंबर खाली घ्या आणि मग पाय हळूहळू खाली घेऊन आधी पायाची पावले जमिनीवर टेकवा म्हणजे पाय गुडघ्यात दुमडले जातात. मग हळूहळू पाय संपूर्णपणे जमिनीवर पसरवा. ही स्थिती पुढचे काही दिवस करा.
या स्थितीची सवय झाल्यावर मग पुढची स्थिती करण्याचा प्रयत्न करा.
स्थिती तिसरी
दुसरी स्थिती अगदी सहजपणे करता येऊ लागल्यावर ही स्थिती करण्याचा प्रयत्न करा.
- सर्वप्रथम, शरीर आणि पाय ताणून पाठीवर झोपा (ही पहिली पायरी आहे).
- आता, हात जमिनीवर, सरळ आणि आपल्या पायांना समांतर स्थितीत ठेवा. शरीर पूर्णपणे सैल सोडा.
- त्यानंतर, तुमचे पाय गुडघ्यात वाकवा. हळूहळू तळपाय वर करा. पहिल्याच प्रयत्नात ते अवघड असल्याने हळूहळू पाय वर करा.
- आता तुमची कंबर वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपोआप तुमचे पाय तुमच्या डोक्याकडे ढकलले जातील. सुरुवातीला हे अवघड जातं म्हणून कंबर उचलण्यासाठी आपल्या हातांची मदत घ्या.
- एकदा तुम्ही तुमची कंबर पूर्णपणे उचलली आणि वाकवली की तुमचे पाय तुमच्या डोक्याच्या जवळपास असतील. आता तुमच्या पायांचे चवडे म्हणजे बोटांचा भाग जेव्हडा डोक्याकडे नेता येईल तेवढा नेण्याचा प्रयत्न करा. (आकृती पहा)
या स्थितीला हलासन (नांगराची मुद्रा) म्हणतात. नवशिक्यांनी पहिल्या प्रयत्नात ते करण्याचा प्रयत्न करू नये. हे आसन शीर्षासन आणि सर्वांगासनापेक्षा जास्त फायदेशीर आहे.
ही स्थिती जमली कि आसन सिद्ध झालं असं म्हणता येईल. या स्थितीत सुरुवातीला २ सेकंदांपासून राहून मग हळूहळू वेळ वाढवायला हरकत नाही. मात्र जोपर्यंत या स्थितीचा आनंद मिळतो आहे तोपर्यंतच आसनाच्या स्थितीत रहा.
हलासन करण्यापूर्वी घ्यायची खबरदारी
- हे आसन सकाळी किंवा संध्याकाळी केले जाऊ शकते,
- परंतु फक्त रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 3-4 तासांनंतर हे आसन करावं.
- आसन करताना श्वास सामान्य ठेवा. आपले पाय डोक्याकडे नेताना किंवा उचलताना हळू हळू श्वास घ्या आणि स्थिती सोडताना हळू हळू श्वास घ्या.
- आसन सहजपणे जमत नसल्यास ते करण्यासाठी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत तुम्हाला सहजपणे जमत आहे तोपर्यंतच हे आसन करा.
- नवशिक्या व्यक्तींसाठी वर दिलेली प्राथमिक स्थिती योग्य आहे.
हलासनचे फायदे
- पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
- विविध स्नायूंच्या स्ट्रेचिंगमुळे किंवा आकुंचनमुळे ते सर्व स्नायूंच्या रक्ताभिसरणाचे नियमन करते.
- पाठीचा कणा, पाय, मानेचा मागील भाग आणि गळ्याचा भाग, कंबर, हृदय, पोट यांना ताकद देते.
- हे आसन नियमित करण्यामुळे पाठदुखीची शक्यता कमी होते.
- हे आसन थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे; विशेषत: शारीरिक श्रमाचे काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयोगी आहे.
- हे आसन नियमित करण्यामुळे पाठीला कुबड निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
तर आज आपण वरील लेखात आपण हलासनची माहिती आणि फायदे जाणून घेतले. या आसनाचा नियमित अभ्यास केल्यामुळे विशेषतः सकाळी केल्याने दिवसभर उत्साह राहतो असा अनेकांचा अनुभव आहे. आणि संध्याकाळी अभ्यास केल्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. मात्र तुम्हाला जर काही शारीरिक इजा झाली असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हे आसन करणे योग्य ठरेल.
Comments
Post a Comment