हल्ली आपल्याला एक बातमी सतत ऐकू येते —
"वय फक्त 28… आणि हार्ट अटॅक!"
पूर्वी हा आजार 50–60 वयात येत होता, पण आता तो तरुणांमध्ये वाढतोय.
खरंच 30 च्या आधी हार्ट अटॅक येऊ शकतो का?
याचं उत्तर आहे हो… आणि याची कारणं तर खूपच धक्कादायक आहेत!

कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कारणं

सततचा ताण (Stress)

हल्ली कामाचा प्रचंड ताण, EMI किंवा कर्जाचे हप्ते, भविष्याची चिंता, आणि अजून एक मोठं कारण म्हणजे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स…
मंडळी, कारण काहीही असू देत मानसिक ताण तणावामुळे शरीरात Cortisol वाढतो ज्यामुळे
  • ब्लड प्रेशर वाढतं
  • हृदयावर जास्त ताण येतो
  • हार्ट अटॅकचा धोका वाढतो

व्यसनाधीनता –

हल्ली दारू, सिगारेट, तंबाखू या गोष्टी फार सामान्य झाल्या आहेत. मी खूप कमी घेतो असं सगळेच म्हणतात पण असं म्हणणं धोकादायक आहे.
व्यसनांमुळे :
  • रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
  • त्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचतो
  • रक्ताची गुठळी होण्याचा धोका वाढतो
जो भविष्यात हार्ट अटॅकचं कारण बनतो. त्यामुळे लक्षात ठेवा कुठलंही व्यसन मग त्याचं प्रमाण कमी असलं तरी सुरक्षित नाही.

डोळे कोरडे पडतात? डोळ्यांची जळजळ, खाज? दुर्लक्ष केलंत तर मोठा धोका!
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/dry-eyes-problem.html

जंक फूड + प्रोसेस्ड डाएट

हल्ली हॉटेलिंग किंवा बाहेरचं खाणं ही एक लाईफ स्टाईल झाली आहे. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक्स या प्राथमिक गरजा झाल्या आहेत. मात्र, यामध्ये असतं:
  • Trans Fat (जे मानव निर्मित आणि शरीराला घटक असतात)
  • जास्त मीठ
  • जास्त साखर
हे सगळं मिळून हार्ट ब्लॉकेज लवकर तयार करतं.

झोपेची कमतरता – दुर्लक्षित कारण

हल्ली कामाचे जास्त तास, मोबाईलचा अति वापर यामुळे अनेकजण पूर्ण झोप घेत नाहीत. रोज 5–6 तास झोप पुरेशी आहे असं त्यांना वाटतं.
त्यामुळे
  • शरीराला विश्रांती मिळत नाही. शरीराची झीज भरून निघत नाही.
  • रक्तदाब वाढतो, रक्तातील साखर वाढते, वजन वाढतं
  • आणि हृदय कमजोर होतं
त्यामुळे पुरेशी झोप (किमान ८-९ तास)ही शरीराची सामान्य गरज आहे

लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html

अचानक Heavy Workout, Steroids

सिनेमा मध्ये बघून अनेक जण व्यायामाकडे वळले आहेत.
मात्र, अचानक जड वजन उचलणे, बॉडी बनवण्याची घाई म्हणून steroids वापर, कार्डिओ व्यायामाचा अतिरेक, यामुळे
  • हृदयावर अचानक ताण येतो
  • काही केसेसमध्ये अचानक हार्ट फेल होतं
  • त्यामुळे Exercise करा, पण योग्य पद्धतीने करा

अनुवांशिक कारणं –

घरात कोणाला:
  • लवकर हार्ट अटॅक आला असेल
  • कमी वयात रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल असे त्रास असतील
तर तुम्ही High Risk Category मध्ये येता.
त्यामुळे तुमच्या शरीराची अगदी २५ वर्षांपासून नियमित तपासणी खूप महत्त्वाची आहे

औषधं घेत असूनही साखर वाढते? ही 7 कारणे धक्कादायक आहेत
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-reasons-of-sudden-blood-sugar-spike.html

लक्षणांकडे दुर्लक्ष

हार्ट अटक ची विशिष्ट्य लक्षणं आहेत आणि ही लक्षणं धोकादायक असू शकतात:
  • छातीत दडपण
  • डाव्या हातात वेदना
  • घाम, चक्कर येणे
  • श्वास घ्यायला त्रास होणे

मात्र तरुण वय असल्याने त्याला
  • गॅस असेल
  • थकवा असेल
अशी कारणं दिली जातात.
त्यामुळे अशी एक किंवा अनेक लक्षणं असतील तर कृपया वेळेत डॉक्टरांकडे जा – जीव वाचू शकतो!

हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी 5 Golden Rules

  • रोज 30 मिनिट चालणं
  • सिगारेट दारू किंवा इतर व्यसनं पूर्ण बंद करा
  • घरी बनवलेलं आणि कमी तेलाचं अन्न खा
  • किमान ८-९ तास झोप
  • वर्षातून एकदा हेल्थ चेकअप

मंडळी, वय लहान आहे म्हणून हार्ट मजबूत असतंच असं नाही!
त्यामुळे आज काळजी घेतली नाही, तर उद्या उशीर होऊ शकतो.
हा ब्लॉग तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की शेअर करा. कारण एक शेअर = एक जीव वाचू शकत