तुम्ही औषधं घेताय…
डाएट पाळताय…
तरीही ब्लड शुगर अचानक वाढतेय?
आज आपण बघणार आहोत अशा 7 चुका, ज्या 90% डायबिटीस पेशंट रोज करतात!
डाएट पाळताय…
तरीही ब्लड शुगर अचानक वाढतेय?
आज आपण बघणार आहोत अशा 7 चुका, ज्या 90% डायबिटीस पेशंट रोज करतात!
नमस्कार मंडळी,
आजचा व्हिडिओ प्रत्येक डायबिटीस पेशंटसाठी खूप महत्त्वाचा आहे.
जर तुमची शुगर कधी अचानक 180–200 च्या वर जात असेल,
तर औषध नव्हे – तर तुमच्या चुका शोधणं गरजेचं आहे.
आजचा व्हिडिओ प्रत्येक डायबिटीस पेशंटसाठी खूप महत्त्वाचा आहे.
जर तुमची शुगर कधी अचानक 180–200 च्या वर जात असेल,
तर औषध नव्हे – तर तुमच्या चुका शोधणं गरजेचं आहे.
रक्तातील साखर (Blood Sugar) वाढवणाऱ्या ७ चुका
चूक नं.1 – मी गोड खात नाही म्हणजे साखर वाढणार नाही
भात, बटाटा, ब्रेड किंवा बेकरी प्रॉडक्ट्स, शेवया किंवा नूडल्स हे सगळे पदार्थ चवीला गोड नसले तरी शरीरात साखरेचं प्रमाण वाढवतात.
याच कारण म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात जे तुमच्या रक्तातील साखर वाढवतात.
याच कारण म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात जे तुमच्या रक्तातील साखर वाढवतात.
मग याला उपाय काय?
- भात, ब्रेड, बटाटा, बेकरी प्रॉडक्ट्स, शेवया किंवा नूडल्स कमी प्रमाणात खा
- आहारात भाज्या आणि प्रोटीन जास्त प्रमाणात खा
चूक नं.2 – वेळेवर न खाणं / जेवण स्किप करणं किंवा टाळणं
अनेकांचा एक मोठा गैरसमज असतो की जेवण स्किप केलं म्हणजे टाळलं कि शुगर कमी होईल कारण पोटात अन्नच गेलं नाही तर अर्थातच साखर जाणार नाही पण ही सगळ्यात मोठी चूक आहे.
तुमचं जेवण जेवण उशिरा झालं किंवा तुम्ही जेवण करायचं टाळलं तर आपलं शरीर स्ट्रेस हार्मोन सोडतं, ज्याचा परिणाम म्हणून राक्तातील साखर वाढते
तुमचं जेवण जेवण उशिरा झालं किंवा तुम्ही जेवण करायचं टाळलं तर आपलं शरीर स्ट्रेस हार्मोन सोडतं, ज्याचा परिणाम म्हणून राक्तातील साखर वाढते
मग याला उपाय काय?
- भूक लागली की जेवण करा, टाळू नका.
- जेवणाच्या किंवा खाण्याच्या वेळा ठरवून घ्या आणि त्याच वेळांना जेवत घेत जा ा
- वाटल्यास दर 3–4 तासांनी थोडं-थोडं खा
डोळे कोरडे पडतात? डोळ्यांची जळजळ, खाज? दुर्लक्ष केलंत तर मोठा धोका!
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/dry-eyes-problem.html
चूक नं.3 – फळं कधीही, कितीही खाणं
मंडळी, फळं आरोग्यदायी आहेत… पण ती खाण्यासाठी सुद्धा वेळ आणि प्रमाण महत्त्वाचं महत्वाचं आहे.
रात्री फळं खाणं टाळावं तसंच फळांचा रस घेणं सुद्धा टाळावं कारण फळांच्या रसामध्ये फक्त साखरच शिल्लक राहते फळातील बरीचशी पौष्टिक तत्व निघून जातात.
रात्री फळं खाणं टाळावं तसंच फळांचा रस घेणं सुद्धा टाळावं कारण फळांच्या रसामध्ये फक्त साखरच शिल्लक राहते फळातील बरीचशी पौष्टिक तत्व निघून जातात.
मग याला उपाय काय?
- फळं शक्यतो सकाळी किंवा दुपारी खावी
- फळांचा रस पिण्याऐवजी आख्ख फळ खाणं फायदेशीर ठरेल
चूक नं.4 – ताण-तणाव (Stress)
तणावात शरीर कार्टिसोल (Cortisol) नावाचं हार्मोन सोडतं. हे हार्मोन रक्तातील शुगर वाढवतं. त्यामुळे तुमचा डाएट बरोबर आहे पण स्ट्रेस जास्त आहे त्यामुळे शुगर वाढते हे सुद्धा खूप लोकांचं कारण आहे!
मग याला उपाय काय?
- दररोज 10 मिनिट मोकळ्या हवेत फिरायला जाणं, ज्यामुळे स्ट्रेस आपोआप कमी होतो
- मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत वेळ घालवणं, गप्पा मारणे यामुळे आपलं मन हलकं होतं
- दररोज श्वसनाचे व्यायाम (Deep breathing) करणं
वय फक्त 25–30… तरी हार्ट अटॅक! कारण ऐकून धक्का बसेल
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/heart-attack-in-early-age.html
चूक नं.5 – झोप कमी / उशिरा झोपणं
हल्ली कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना रात्री नीट झोप मिळत नाही. तसेच मोबाईल चा अति वापर सुद्धा कमी झोपेचं कारण आहे. अनेकजण त्यामुळे 5–6 तास झोप सुद्धा घेऊ शकत नाहीत.
झोप नीट न झाल्यामुळे शरीरातील इन्सुलिन नीट काम करत नाही आणि त्यामुळे सकाळी फास्टिंग ची शुगर वाढलेली दिसते
झोप नीट न झाल्यामुळे शरीरातील इन्सुलिन नीट काम करत नाही आणि त्यामुळे सकाळी फास्टिंग ची शुगर वाढलेली दिसते
मग याला उपाय काय?
- रात्री किमान 8 तास झोप घेणे
- रात्री झोपण्याच्या आधी किमान १-२ तास मोबाईल चा वापर बंद करणे.
- एकूणच मोबाईलचा वापर कमी करणे
- जमल्यास कामाच्या वेळेचं नियोजन करणे
चूक नं.6 – औषध चालेल पण व्यायाम नको
अनेकजण विचार करतात काही त्रास झाल्यास औषध घेऊ पण व्यायाम जमणार नाही. मात्र ही खूप मोठी चूक आहे. नुसत्या औषधामुळे रोग पूर्ण नष्ट होतो हा खूप मोठा गैरसमज आहे.
मग याला उपाय काय?
- रोज किमान 30 मिनिट चालणं
- तसंच जेवणानंतर 5-10 मिनिट चालणं
लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html
चूक नं.7 – शुगर फक्त कधी-कधी तपासणं
तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला त्रास होत नाही यावर डायबिटीस चालत नाही. तसं केल्यास भविष्यात एकदम मोठा त्रास होऊ शकतो.
मग याला उपाय काय?
- नियमित तपासणी शुगर ची करायला हवी ज्यामध्ये किमान
* Fasting
* PP
* HbA1c (3 महिन्यांनी)
तर अशा प्रकारे या सात चुका टाळल्या तर तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, जर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर -
- वेळेवर खा
- तणाव कमी करा
- झोप पूर्ण घ्या
- रोज हालचाल ठेवा
- नियमित साखर तपासणी करत जा

0 Comments