हल्ली संपूर्ण जगभरात टाइप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes) हा आजार झपाट्याने वाढतोय. पूर्वी हा आजार फक्त वयस्कर लोकांमध्ये दिसून येत असे, पण आज अगदी २५–३० वयाच्या तरुणांनाही डायबिटीस होतोय.
अनेक जणांना प्रश्न पडतो की, “मी तर फार गोड खात नाही, तरीही मला डायबिटीस कसा झाला?” याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे – डायबिटीस फक्त साखर खाण्यामुळे होत नाही, त्यामागे अनेक कारणं असतात.
या लेखात आपण टाइप 2 डायबिटीस म्हणजे काय?, तो कसा होतो?, आणि त्यामागची खरी कारणं कोणती? हे सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
टाइप 2 डायबिटीस म्हणजे काय?
आपल्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी Insulin नावाचं हार्मोन काम करतं. हे हार्मोन पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडा मधून तयार होतं.
टाइप 2 डायबिटीसमध्ये दोन मुख्य समस्या होतात:
- शरीरातील पेशी Insulin ला योग्य प्रतिसाद देत नाहीत याला Insulin Resistance असं म्हणतात
- हळूहळू शरीर पुरेसं Insulin तयारही करू शकत नाही
यामुळे रक्तातील साखर वाढायला लागते आणि ही साखर दीर्घकाळ नियंत्रणात राहिली नाही तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीसमधील फरक
- Type 1 Diabetes: लहान वयात होतो, शरीर Insulin बनवणं थांबवतं
- Type 2 Diabetes: प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित, हळूहळू वाढतो आज 90% पेक्षा जास्त लोकांना टाइप 2 डायबिटीस आढळतो.
टाइप 2 डायबिटीस होण्याची मुख्य कारणं
१) चुकीची जीवनशैली – सर्वात मोठं कारण
आजचं जीवन म्हणजे:
- दिवसभर बसून काम व्यायामाला वेळ नाही किंवा व्यायामाची टाळाटाळ
- Mobile, TV, Laptop समोर तासन्तास बसणं
त्यामुळे शरीर हालचाल करत नसेल तर पेशी Insulin ला प्रतिसाद देणं कमी करतात, आणि हळूहळू डायबिटीसचा धोका वाढतो.
👉 यावर उपाय म्हणजे दररोज फक्त 30 मिनिट चालणं जे मोठा फरक पाडू शकतं.
२) पोटाची चरबी (Belly Fat) – Silent Danger
अनेक लोक म्हणतात, “माझं वजन तर जास्त नाही.”
पण पोट सुटलेलं असणं (Visceral Fat) हे डायबिटीससाठी अत्यंत धोकादायक आहे.
पोटाजवळ साचलेली चरबी:
- Insulin Resistance वाढवते
- शरीरात सूज (Inflammation) वाढवते
BMI Normal असूनही पोट सुटलेलं असेल, तर डायबिटीसचा धोका असतो.
औषधं घेत असूनही साखर वाढते? ही 7 कारणे धक्कादायक आहेत
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-reasons-of-sudden-blood-sugar-spike.html
३) जास्त साखर आणि Processed Food
डायबिटीस म्हणजे फक्त चहा-कॉफीतील साखर नाही. शरीरात साखर जाण्याचे इतर अनेक मार्ग असतात.
- शीतपेय (Cold drinks)
- बेकरीमध्ये तयार केलेले पदार्थ (Bakery items)
- बिस्किटं, केक (Biscuit, cake)
- वेगवेगळे सॉस फास्ट फूड (Fast food)
हे सगळे पदार्थ शरीरात अचानक साखर वाढवतात आणि पॅनक्रियासवर जास्त ताण टाकतात.
४) झोपेची कमतरता – दुर्लक्षित कारण
आज अनेक लोक:
- रात्री उशिरा झोपतात
- ५–६ तासांपेक्षा कमी झोप घेतात
आणि झोप कमी मिळाली की:
- Insulin च्या उत्पादनाचं काम बिघडतं
- ताण वाढवणारा हार्मोन (Stress hormone) ज्याला कर्टिसॉल (Cortisol) म्हणतात तो वाढतो
- आणि मग रक्तातील साखर (Blood sugar) वाढायला लागते
👉 सलग ७–८ तासांची झोप डायबिटीस टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
गोळ्यांशिवाय साखर कमी होऊ शकते का? जाणून घ्या ७ नैसर्गिक मार्ग
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-natural-ways-to-reduce-blood-sugar.html
५) सततचा मानसिक ताण (Stress)
Stress म्हणजे फक्त मानसिक थकवा नाही, तो शरीरावरही परिणाम करतो.
ताण वाढला की:
- Cortisol hormone वाढतो
- यकृत (Liver) जास्त साखर तयार करतं
- त्यामुळे रक्तातील साखर (Blood sugar) नियंत्रणाबाहेर जाते
Office stress, आर्थिक चिंता, कौटुंबिक तणाव – हे सगळे डायबिटीस वाढवू शकतात.
लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html
६) कौटुंबिक इतिहास (Genetics)
तुमचे,
- आई किंवा वडील डायबिटीसचे रुग्ण असतील
- आजी-आजोबा डायबिटीसचे रुग्ण असतील
- कुणी जवळचे नातेवाईक डायबिटीसचे रुग्ण असतील
तर तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो.
👉 पण लक्षात ठेवा:
आनुवंशिकतेमुळे मधुमेह होण्याचा धोका कमी असतो, पण चुकीची जीवनशैली हे मुख्य
कारण असतं.
त्यामुळे, योग्य सवयी ठेवल्या तर मधुमेहाचा धोका नक्कीच कमी करता
येतो.
७) वाढतं वय आणि हार्मोनल बदल
३०–३५ वयानंतर:
- शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) कमी होते
- शारीरिक हालचाल कमी होते हार्मोनल बदल होतात
महिलांमध्ये:
- PCOS - याला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात, ही एक सामान्य हार्मोनल समस्या आहे, ज्यामुळे महिलांच्या अंडाशयात गाठी तयार होतात, अनियमित मासिक पाळी येते, वजन वाढते आणि पुरळ व अतिरिक्त केसांची वाढ यांसारखी लक्षणे दिसतात, जी हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवतात.
- Menopause - म्हणजे रजोनिवृत्ती, ज्याचा अर्थ स्त्रीच्या आयुष्यातील तो नैसर्गिक टप्पा जिथे तिची मासिक पाळी सलग १२ महिने थांबते आणि अंडाशयातून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची निर्मिती कमी होते किंवा थांबते. हा चाळीशीच्या उत्तरार्धात किंवा पन्नाशीच्या आसपास येतो आणि स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडवून आणत
या कारणांमुळे डायबिटीसचा धोका अधिक वाढतो.
तरुणांमध्ये टाइप 2 डायबिटीस का वाढतोय?
आजच्या तरुण पिढीत:
- जंक फूड खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे
- व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव
- रात्री उशिरा झोपणं
- सतत मोबाईल, कॉम्पुटर चा वापर
यामुळे शरीर लवकर Insulin Resistant बनतं आणि डायबिटीस लवकर सुरू होतो.
👉 त्यामुळे डायबिटीस हा आता “वयस्कांचा आजार” राहिलेला नाही.
टाइप 2 डायबिटीसची सुरुवातीची लक्षणं सतत तहान लागणं वारंवार लघवी होणं थकवा, आळस जखमा उशिरा भरून येणं अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं जर अशी लक्षणं दिसत असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी करणं गरजेचं आहे.
टाइप 2 डायबिटीस टाळता येतो का?
टाइप 2 डायबिटीस टाळता येतो किंवा नियंत्रित करता येतो. मात्र, त्यासाठी काही सोप्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.
- दर रोज किमान ३०–४० मिनिट चालणं
- बाहेरचं अन्न किंवा प्रक्रिया केलेलं अन्न खाणं कमी करणं
- साखर आणि गोड पेय टाळणं
- पुरेशी झोप घेणं (किमान ८-९ तास)
- ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम करणं
थोडक्यात, छोटे छोटे बदल करून मोठा परिणाम घडवून आणणं
मंडळी, टाइप 2 डायबिटीस अचानक होत नाही. तो वर्षानुवर्षे चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. आणि या सवयी आज बदलल्या नाहीत तर -
- उद्या औषधं वाढतात
- नंतर गुंतागुंत (Complications) सुरू होतात
👉 त्यामुळे आजपासूनच योग्य निर्णय घ्या, कारण आरोग्य एकदाच मिळतं.

0 Comments