मंडळी, किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे जो आपल्या शरीरात तयार होणारे अनावश्यक घटक, विषारी द्रव्य हे सगळं बाहेर टाकण्याचं काम करतो. पण काही कारणानी किडनी हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते आणि त्याची लक्षणं आपल्याला सुरुवातीला दिसत नाहीत. त्यामुळे अनेक जणांना किडनीसंबंधी होणारे त्रास किंवा आजार उशिरा समजतात.

सामान्यपणे मधुमेह(Diabetes), रक्तदाब (Blood Pressure), चुकीची जीवनशैली आणि औषधांचा अति वापर तोसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या काही कारणांमुळे किडनीसंबंधी आजार झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं आपल्याला कळली तर त्याचा नक्कीच उपयोग होईल.

किडनी खराब होणं म्हणजे काय?

किडनी आपल्या रक्तातील विषारी द्रव्य, अनावश्यक घटक आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करून मूत्र तयार करतात, परंतु ते खनिजे (जसे की सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम) संतुलित करतात, रक्तदाब नियंत्रित करतात, लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात आणि मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन डी सक्रिय करतात, मात्र किडनीची ही फिल्टर करण्याची क्षमता कमी होते, तेव्हा शरीरात विषारी घटक साठू लागतात. यालाच किडनीचा आजार (Kidney Disease) असं म्हणतात. किडनी आजार दोन प्रकारचे असतात: Acute Kidney Disease – अचानक होणारा त्रास Chronic Kidney Disease (CKD) – हळूहळू वाढणारा आजार विशेष म्हणजे, किडनी ४०–५०% पर्यंत खराब झाली तरीही अनेक वेळा त्याची लक्षणं दिसत नाहीत.

वय फक्त 25–30… तरी हार्ट अटॅक! कारण ऐकून धक्का बसेल
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/heart-attack-in-early-age.html

किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं

१) लघवीत बदल होणे

किडनी खराब होण्याचा सगळ्यात पहिलं संकेत लघवीतून मिळतो. लघवीचा रंग गडद होणे फेस येणे लघवीत जळजळ लघवी कमी किंवा जास्त होणे ही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

२) रात्री वारंवार लघवी लागणे

रात्री वारंवार लघवीला जावं लागणं हे किडनीच्या कमकुवत कार्याचं किंवा किडनीतील बिघाडाचं लक्षण असू शकतं. ज्यांना डायबिटीस किंवा रक्तदाब (Blood Pressure) आहे, त्यांनी याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

३) पाय, घोटे, डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर सूज किडन

शरीरातील जास्तीचं पाणी बाहेर टाकू शकत नाही तेव्हा पाय, घोटे, डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर सूज येते. सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला वाटणं हे देखील धोक्याचं लक्षण आहे.

लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html

४) सतत थकवा आणि कमजोरी

किडनी खराब झाली किंवा होण्यास सुरुवात झाली की शरीरात लाल रक्तपेशी कमी होतात. यामुळे: पटकन थकवा येतो कामात मन लागत नाही अशक्तपणा जाणवतो अनेक लोक याला फक्त “थकवा” समजून दुर्लक्ष करतात.

५) भूक न लागणे

किडनी नीट काम करत नसल्यामुळे शरीरात विषारी घटक साचतात. त्यामुळे: भूक लागत नाही जेवण नकोसं वाटतं वजन कमी होऊ शकतं

६) मळमळ, उलटी किंवा तोंडाला कडू चव

किडनी खराब होत असताना शरीरातील विषारी पदार्थ रक्तात मिसळतात. त्यामुळे: मळमळ उलटी तोंडाला कायम कडू चव लागते ही लक्षणं दिसू शकतात.

किडनीबद्दलचे 7 धोकादायक गैरसमज
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/kidney-myths-inmarathi.html

७) त्वचेवर खाज किंवा कोरडेपणा

किडनी नीट काम करत नसल्यामुळे त्वचेत विषारी घटक साठतात. त्याचा परिणाम म्हणून अंगावर खाज त्वचा कोरडी होणे त्वचेवर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसून येतात.

८) श्वास घेण्यास त्रास

शरीरात जास्त पाणी साठल्यामुळे फुफ्फुसांवर दाब येतो. त्याचा परिणाम म्हणून श्वास लागणे थोडं चालल्यावर दम लागणे श्वास घ्यायला त्रास होणे हे त्रास होऊ शकतात आणि ही लक्षण गंभीर असू शकतात.

९) एकाग्रता कमी होणे

किडनीला झालेल्या आजारामुळे मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे चक्कर येणे लक्ष न लागणे स्मरणशक्ती कमी वाटणे असे त्रास दिसून येतात.

औषधं घेत असूनही साखर वाढते? ही 7 कारणे धक्कादायक आहेत
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-reasons-of-sudden-blood-sugar-spike.html

१०) BP नियंत्रणात न राहणे

उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचं कारण आणि परिणाम दोन्ही असू शकतं. उच्च रक्तदाब (Blood Pressure) औषधं घेऊनही कंट्रोल होत नसेल, तर मात्र किडनीची तपासणी करणं गरजेचं आहे.

कोणाला किडनीच्या आजाराचा धोका जास्त असतो? 

  • डायबिटीस असलेले लोक 
  • उच्च रक्तदाब (Blood Pressure) असलेले रुग्ण 
  • जास्त वेदनाशामक औषध घेणारे 
  • कमी पाणी पिणारे 
  • लठ्ठपणा 
  • धूम्रपान व दारू सेवन 
  • कुटुंबात किडनी आजाराचा इतिहास

किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? 

  • पुरेसं पाणी प्या 
  • मीठ आणि प्रोसेस्ड फूड कमी करा 
  • BP आणि Sugar नियंत्रणात ठेवा 
  • डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेऊ नका 
  • नियमित तपासणी करा 
  • वजन नियंत्रणात ठेवा

डॉक्टरांकडे तात्काळ कधी जावे? 

  • लघवी पूर्ण बंद होणे 
  • खूप जास्त सूज 
  • श्वास घेण्यास त्रास 
  • अचानक वजन वाढ 
  • अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

थोडक्यात, किडनीचा आजार हा हळूहळू वाढणारा पण अत्यंत गंभीर आजार आहे. शरीर सुरुवातीला संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे वेळेवर लक्षणं ओळखली, तपासणी केली आणि जीवनशैली सुधारली तर किडनी अनेक वर्षे सुरक्षित राहू शकते. 

त्यामुळे, वेळीच सावध व्हा, कारण किडनी आहे तर आयुष्य आहे.