हल्ली उच्च रक्तदाब ही समस्या तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये वाढताना दिसते.
डॉक्टरांकडे गेल्यावर सगळ्यात पहिला सल्ला मिळतो तो म्हणजे —
मीठ कमी करा

पण खरंच फक्त मीठ कमी केल्याने उच्च रक्तदाब कंट्रोल होतो का?
की हे फक्त अर्धसत्य आहे?

आज आपण यामागची कारणं, गैरसमज आणि योग्य उपाय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

मीठ आणि BP यांचा काय संबंध आहे?

मीठ ामधील सोडियम (Sodium) शरीरात पाणी धरून ठेवतं.
शरीरात जास्त सोडियम झाल्यास रक्तात पाण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि रक्तदाब रक्तदाब वाढतो.
म्हणजेच, जास्त मीठ = BP वाढण्याची शक्यता जास्त.

पण सगळ्यांचा रक्तदाब मिठामुळेच वाढतो का?

नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
काही लोकांचं शरीर Salt Sensitive म्हणजे मीठाच्या बाबतीत संवेदनशील असतं, तर काहींचं नसतं.

Salt Sensitive लोक कोण?

  • ज्यांना किडनीचे आजार आहेत
  • वय ४० पेक्षा जास्त असलेले
  • डायबिटीस असलेले
  • लठ्ठपणा असलेले
  • कुटुंबात BP चा इतिहास असलेले

या लोकांमध्ये मीठ कमी केल्याने BP खूप प्रमाणात कमी होतं.

मग फक्त मीठ कमी केलं की BP कंट्रोल होतो का?

उत्तर: नाही, पूर्णपणे नाही.
मीठ कमी करणं एक महत्त्वाचा भाग आहे, पण एकमेव उपाय नाही.

BP वाढण्यामागे इतर कारणंही असतात:

  • ताणतणाव (Stress)
  • व्यायामाचा अभाव
  • लठ्ठपणा
  • धूम्रपान / दारू
  • झोपेची कमतरता
  • हार्मोनल बदल

तरुणांमध्ये रक्तदाब (Blood Pressure) झपाट्याने का वाढतोय?
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/bp-incresing-in-youngsters.html

किती मीठ खाणं सुरक्षित आहे?

जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते:

  • दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा (सुमारे १ चमचा) कमी मीठ खाणं आरोग्यासाठी उपयोगी आहे.
  • भारतात सरासरी व्यक्ती ९-१० ग्रॅम मीठ खातो

जास्त मीठ कुठून खाल्लं जातं? (Hidden Salt)

बर्‍याच लोकांना वाटतं – “मी वरून मीठ टाकत नाही मग मीठ कुठून खाल्लं जातं?”

  • पापड
  • लोणचं
  • चिप्स, नमकीन (फरसाण, चिवडा)
  • ब्रेड
  • रेडी मिक्स मसाले
  • सॉस, चटण्या

मीठ अचानक खूप कमी केल्याचे धोके

अचानक खूप कमी मीठ केल्याने:

  • चक्कर येणे
  • थकवा
  • कमी BP (Low BP)
  • स्नायूंमध्ये आकडी येणे

म्हणून मीठ हळूहळू आणि संतुलित प्रमाणात कमी करायला हवं.

BP कमी करणारे 7 नैसर्गिक पदार्थ – गोळ्यांशिवाय रक्तदाब नियंत्रणात!
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/high-bp-controlling-foods.html

BP नैसर्गिकरित्या कंट्रोल ठेवण्यासाठी काय करावं?

  • मीठ कमी करा (पण एकदम पूर्णपणे बंद करायचं नाही)
  • दररोज किमान 30 मिनिटं चालणं
  • पोटॅशियमयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात खाणं (केळी, नारळ पाणी, पालक)
  • ताण कमी करा (योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम)
  • वजन नियंत्रणात ठेवा
  • झोप ८-९ तास

डॉक्टर काय सांगतात?

डॉक्टरांचं स्पष्ट मत आहे:
मीठ कमी केल्याने BP कमी होतं, पण lifestyle बदलाशिवाय पूर्ण कंट्रोल शक्य नाही.

म्हणून मीठ कमी केल्याने BP नक्कीच कमी होतं पण फक्त मीठ कमी करून BP पूर्णपणे कंट्रोल होत नाही.
त्यासाठी योग्य आहार + व्यायाम + ताणतणावावर नियंत्रण अतिशय आवश्यक आहे.

जर हा लेख उपयुक्त वाटला असेल तर:
👍 शेअर करा
💬 तुमचं मत कमेंटमध्ये सांगा
📌 BP, Sugar, Health Updates साठी पेज Follow करा