हल्ली लाखो जणांना थायरॉईडचा त्रास होतो आहे. लोक नियमितपणे Thyroidची औषधं सुद्धा घेत आहेत.
तरीही अनेक जणांना असं वाटतं -
- TSH normal आहे, पण BP वाढतोय
- Thyroid control असूनही Sugar खाली येत नाही
- औषध घेतोय, तरी थकवा, वजन आणि Diabetes वाढतोय
जर तुम्हालाही हे प्रश्न पडत असतील, तर समस्या तुमच्यात नाही तर तुम्हाला असलेली माहिती अपूर्ण आहे.
हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला कळेल:
- Thyroid औषध नियमित घेऊनही BP/Diabetes का वाढतो?
- शरीरात नेमकं काय बिघडतं?
- आणि कोणते उपाय त्यावर खरोखर उपयोगी पडतात?
Thyroid म्हणजे फक्त TSH नाही!
Thyroid ही एक लहानशी ग्रंथी असली, तरी तिचा प्रभाव:
- शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism)
- वजन
- हृदयाचे ठोके
- रक्तदाब (Blood Pressure)
- आणि रक्तातील साखर (Blood Sugar)यावर थेट पडतो.
Thyroid कमी असल्यास (Hypothyroidism):
- शरीराचा वेग कमी होतो
- शरीरात चरबी साठते
- शरीराची Sugar वापरण्याची क्षमता घटते
त्यामुळे BP आणि Diabetes वाढण्याची पार्श्वभूमी तयार होते.
मोठा गैरसमज: "TSH normal म्हणजे सगळं ठीक"
खूप लोक फक्त TSH report पाहून समाधानी होतात.
पण सत्य असं आहे की:
- TSH normal असू शकतो
- पण शरीर Thyroid hormone योग्य प्रकारे वापरत नसेल
यालाच म्हणतात, थायरॉइडच्या हार्मोन्स ना अवरोध (Thyroid Hormone Resistance)
याचा परिणाम काय होतो?
- वजन कमी होत नाही
- थकवा जात नाही
- Sugar आणि BP हळूहळू वाढतात
१) थायरॉईड (Thyroid) आणि इन्सुलिन अवरोध (Insulin Resistance) यांचा खोल संबंध
हायपर थायरॉईडीझम (Hypothyroidism) मुळे:
- शरीरात चरबी वाढते
- विशेषतः पोटाभोवती (visceral fat) चरबीचा जाडसर घेर तयार होतो
ही चरबी:
- इन्सुलिन चं काम अडवते
- पेशींना Sugar आत घेऊ देत नाही
यालाच म्हणतात इन्सुलिन अवरोध (Insulin Resistance) हाच Diabetes चा पहिला टप्पा असतो
म्हणूनच:
Thyroid औषध असूनही Diabetes वाढतो
२) Thyroid मुळे BP (विशेषतः खालचा BP) वाढतो
Thyroid कमी असेल तर:
- रक्तवाहिन्या कडक होतात
- रक्ताचा प्रवाह कमी लवचिक होतो
यामुळे:
- Diastolic BP (खालचा BP) वाढतो
अनेक लोक म्हणतात:
"वरच BP ठीक आहे, पण खालच 95-100 असतो"
हे बहुतेक वेळा थायरॉईडशी संबंधित बीपी (Thyroid-related BP) असतं.
३) Thyroid औषध घेण्याची वेळ आणि पद्धत चुकीची
हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, पण दुर्लक्षित राहतो.
Thyroid कंट्रोलमध्ये असूनही वजन का कमी होत नाही? – कारणं, सत्य आणि उपाय
https://befitwithyoga.blogspot.com/2026/01/thyroid-and-weight-loss.html
Thyroid औषध योग्य कसं घ्यायचं?
- सकाळी घ्यावं
- पूर्ण रिकाम्या पोटी घ्यावं
- फक्त पाण्यासोबत घ्यावं
- आणि त्यानंतर ३०-४५ मिनिट काहीही खायचं नाही
पण अनेकजण सामान्य चुका काय करतात:
- चहा/कॉफीसोबत गोळी घेतात
- कॅल्शिअम (Calcium), लोहाच्या (Iron) च्या गोळी सोबत घेतात
- कधी सकाळी घेतात, कधी दुपारी घेतात
यामुळे औषध पूर्णपणे प्रभाव दाखवत नाही. हार्मोन्स असंतुलित (Hormone imbalance) राहतात. BP/Sugar वाढत राहतं
४) ताण (Stress) आणि झोपेचा अभाव
Thyroid असलेल्या लोकांमध्ये:
- झोप कमी असते
- सतत थकवा येतो
- चिडचिड होत राहते
ताणतणाव वाढला की:
- कार्टिसोल हॉर्मोन (Cortisol hormone) वाढतो
- हा हॉर्मोन (hormone) साखर आणि रक्तदाब दोन्ही वाढवतो
म्हणजे Thyroid चं औषध चालू असूनही, ताणतणाव नियंत्रणात नसेल तर मधुमेह आणि रक्तदाब वाढणारच.
५) "फक्त साखर बंद" हा मोठा भ्रम
अनेक लोक म्हणतात:
"मी गोड खात नाही, तरी साखर वाढते"
कारण :
- आहारात जास्त भाकरी/पोळी
- आहारात पांढरा ब्रेड, पास्ता, साखरयुक्त पेये, पेस्ट्री आणि स्नॅक्स
- कमी प्रोटीनयुक्त आहार
- कमी हालचाल
Thyroid असताना डाएट परिपूर्ण नसेल तर साखर नियंत्रित होत नाही
६) फक्त TSH टेस्ट पुरेशी नाही
बहुतेक लोक वर्षातून एकदाच TSH तपासतात
पण खालील तपासण्या सुद्धा आवश्यक असतात :
- Free T3, Free T4
- HbA1c
- Lipid Profile
- Vitamin D, B12
कारण थायरॉईड, साखर आणि कोलेस्टेरॉल एकमेकांशी संबंधित आहेत
थायरॉईड (Thyroid), रक्तदाब (Blood Pressure) आणि मधुमेह (Diabetes)
हे तिन्ही एकत्र असतील तर:
- हृदयविकाराचा धोका वाढतो
- Stroke risk वाढते
- Kidney damage होऊ शकते
पण योग्य वेळी सुधारणा केली तर हे सगळं नियंत्रित करता येतं.
उपाय जे खरोखर काम करतात
- Thyroid औषध योग्य वेळेला घ्या
- वजन 5-7% कमी करण्याचा प्रयत्न करा
- रोज किमान 30 मिनिट चालणं
- प्रोटीनयुक्त पदार्थ आहारात वाढवा
- ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान यांचा अभ्यास करा
- साखर आणि रक्तदाब नियमित मोजा
- डॉक्टरांशी औषधे आणि लाइफ स्टाईल बद्दल चर्चा करा
या सर्व माहिती वरून असा निष्कर्ष निघतो कि थायरॉईड चं औषध म्हणजे जादू नाही.
लाइफ स्टाईल, नियंत्रित वजन आणि चौरस आहार महत्वाचे आहेत
त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल औषध असूनही काहीतरी चुकतंय तर तो शरीराचा इशारा आहे - दुर्लक्ष करू नका.
हा लेख उपयोगी वाटला असेल तर:

0 Comments