आपली किडनी म्हणजे शरीराचा फिल्टर म्हणजेच गाळणी असते, जी शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करते.
पण किडनीबद्दल अनेक अर्धवट माहिती आणि अनेक गैरसमज (Myths) पसरलेले आहेत. हे गैरसमज (Myths) असल्यामुळे अनेक लोक उशिरा उपचार घेतात आणि किडनीचं नुकसान वाढतं
आज या ब्लॉगमध्ये आपण किडनीबद्दलचे सर्वात धोकादायक गैरसमज (Myths) दूर करणार आहोत!
किडनीबद्दलचे सर्वात धोकादायक गैरसमज (Myths)
१) किडनी फक्त म्हातारपणीच खराब होते
हल्ली 20–40 या वयातही किडनीचे रुग्ण वाढत आहेत. कारण चुकीची आहे जीवनशैली. याशिवाय इतरही कारणं आहेत.
कारणं:
- मधुमेह - कमी वयात होणारा मधुमेह किडनीसाठी घटक ठरतो.
- उच्च रक्तदाब - सततच्या ताण तणावामुळे हल्ली कमी वयात उच्च रक्तदाब होतो जो किडनीसाठी घटक ठरतो.
- पेनकिलरचा जास्त वापर - हल्ली छोट्या छोट्या दुखण्यासाठी पेनकिलर घेण्याची सवय घातक ठरते आहे. जी भविष्यात किडनीसाठी धोकादायक ठरते.
२) किडनी खराब होत असेल तर वेदना होतात
बहुतेक वेळा किडनीचा आजार Silent असतो म्हणजे किडनी खराब होत असेल तर वेदना होतातच असं नाही.
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं खालील प्रमाणे असू शकतात:
- सतत थकवा येतो
- पाय आणि डोळ्यांची सूज
- लघवीच्या रंगात बदल होतो
त्यामुळे वेदना होऊ लागल्या म्हणजे आजार आधीच वाढलेला असतो!
३) जास्त पाणी प्यायलं की किडनी कायम सुरक्षित
किडनीच्या आरोग्यासाठी पाणी गरजेचं आहे. पण नुसतं पाणी पिण्यामुळे किडनी
सुरक्षित राहते असं नाही.
तसंच प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं सगळ्यांसाठी योग्य नसतं
४) डायलिसिस म्हणजे शेवटचा टप्पा
हा सुद्धा एक गैरसमज आहे. डायलिसिस म्हणजे जीवन वाढवणारी प्रक्रिया आहे
त्यामुळे डायलिसिस + योग्य आहार + डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं हा फॉर्मुला वापरून अनेक रुग्ण नॉर्मल आयुष्य जगतात
५) फक्त दारू पिणाऱ्यांनाच किडनीचा आजार होतो
दारू पिणाऱ्यांबरोबरच दारू न पिणाऱ्यांनाही किडनी आजार होऊ शकतो
याची मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत -
- साखर - रक्तातील साखर सतत वाढलेली असेल तर हळूहळू किडनी खराब व्हायला सुरुवात होते.
- BP - वाढलेलं BP सुद्धा किडनीसाठी धोकादायक असतं
- लठ्ठपणा - हा सुद्धा एक धोकादायक प्रकार आहे जो भविष्यात साखर, BP आणि किडनीसाठी धोकादायक ठरू शकतो
- जंक फूड - हल्लीच्या युगात जंक फूड अनेक रोगांचं मूळ कारण आहे. या प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये अजिबात पोषणमूल्य नसतात उलट शरीराला घटक असे केमिकल, प्रेझर्वेटिव्हस वापरलेले असतात. तसेच अतिरिक्त मीठ, तिखट आणि मसाले वापरल्यामुळे शरीराला मोठा धोका निर्माण होतो.
६) एकदा किडनी खराब झाली की सुधारत नाही
किडनीचा आजार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात कळल्यास योग्य आहार + औषधं + lifestyle मध्ये बदल करून किडनीचं नुकसान थांबवता येतं
७) Herbal औषधं किडनीसाठी सुरक्षित असतात
हा एक फार धोकादायक गैरसमज आहे.
काही आयुर्वेदिक / हर्बल औषधांमुळे किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला नसेल तर कुठलही औषध घेऊ नका
किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी 5 Golden Tips
- BP आणि Sugar कंट्रोलमध्ये ठेवा
- वेदनाशामक औषधांचा अति वापर टाळा
- दरवर्षी Kidney Function Test करा
- मीठ कमी खा
- शरीराच्या गरजेनुसार पाणी प्या
त्यामुळे मंडळी, किडनीबद्दलचे गैरसमज वेळेवर दूर केले नाहीत. तर गंभीर नुकसान होऊ शकतं! त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.
💬 हा ब्लॉग तुमच्या कुटुंबात आणि मित्रांना नक्की शेअर करा कारण किडनीचा आजार नकळत वाढतो ⚠️

0 Comments