हल्ली एक धक्कादायक सत्य समोर येत आहे, पूर्वी ४५-४५ वयानंतर दिसणारे लिव्हरचे आजार

आता थेट २०-३५ वयाच्या तरुणांमध्ये आढळत आहेत!

विशेष म्हणजे…
अनेकजण दारू न पिता सुद्धा
फॅटी लिव्हर, लिव्हर इंफ्लेमेशन, अगदी लिव्हर फेल्युअरच्या उंबरठ्यावर पोहोचत आहेत.

पण असं का होतंय?

लिव्हरचा आजार म्हणजे नेमकं काय?

लिव्हर हे आपल्या शरीराचं

  • डिटॉक्स मशीन - शरीरातील घाण साफ करणारं
  • मेटाबॉलिझम कंट्रोल सेंटर - शरीरातील चयापचयाची क्रिया नियंत्रित करणारं
  • फॅट, साखर, टॉक्सिन्स फिल्टर करणारा अवयव आहे.

जेव्हा लिव्हरवर सतत जास्त ताण येतो,
तेव्हा तो नकळतपणे खराब व्हायला सुरुवात होते.

डोळे कोरडे पडतात? डोळ्यांची जळजळ, खाज? दुर्लक्ष केलंत तर मोठा धोका!
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/dry-eyes-problem.html

तरुणांमध्ये लिव्हर आजार वाढण्याची ७ मुख्य कारणं

१) जंक फूड आणि प्रोसेस्ड आहार

Pizza, Burger, Chips, Cold drinks
ट्रान्स फॅट + साखर = Fatty Liver

२) बसून राहण्याची लाईफस्टाईल

  • व्यायाम नाही किंवा शारीरिक श्रमाचा अभाव
  • चालणं कमी, सतत गाडी वापरण्यामुळे चालणं जवळपास बंद झालं आहे
  • त्यामुळे शरीरात चरबी साठते आणि त्याचा लिव्हरवर थेट परिणाम होतो

३) दारू नाही तरी सॉफ्ट ड्रिंकचा अतिरेक

मद्यपान केलं नाही तरी हल्ली कोल्ड ड्रिंक्स सतत पिण्यामुळे त्यातील साखर, प्रेझर्वेटिव्हस आणि अनेक हानिकारक पदार्थ लिव्हर वर वाईट परिणाम करतात.

वय फक्त 25–30… तरी हार्ट अटॅक! कारण ऐकून धक्का बसेल
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/heart-attack-in-early-age.html

४) वजन वाढणं (Obesity)

वरील ४ कारणांमुळे शरीर आणि पोटावरची चरबी वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्यात आधी लिव्हर फॅटी होतो


५) Painkiller आणि Supplements चा अति वापर

हल्ली जाहिरातींचा अतिरेक झाल्यामुळे त्यातील गोळ्या, औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जातात. हा प्रकार लिव्हरवर स्लो पॉयझनसारखा परिणाम करतो.

६) झोपेचा अभाव आणि ताणतणाव

हल्ली उशिरापर्यंत पार्ट्या, मोबाईल बघत बसणे यामुळे व्यवस्थित झोप मिळत नाही. त्याचा परिणाम म्हणून हार्मोनचं असंतुलन निर्माण होतं जे लिव्हर डॅमेज करतं.

लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html

७) लक्षणांकडे दुर्लक्ष

अनेकदा सतत थकवा येणे, गॅस, भूक न लागणं अशी लक्षणं अनेकांमध्ये दिसून येतात मात्र हे नॉर्मल आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

लिव्हर खराब होत असल्याची सुरुवातीची लक्षणं

  • सतत थकवा
  • पोट फुगल्यासारखं वाटणं / सतत गॅस होणं
  • अचानक वजन वाढणं
  • त्वचेवर पिंपल्स येणं
  • भूक न लागणं
  • डोळे पिवळसर दिसणं (Late stage)

ही लक्षणं Silent Warning आहेत कारण हे सगळं नकळत घडू शकतं.

तरुणांनी लिव्हर वाचवण्यासाठी काय करावं?

  • आठवड्यातून 5 दिवस चालणं / व्यायाम
  • साखर, मीठ आणि जंक फूड कमी खाणे
  • आवश्यक तेव्हा पाणी पिणं
  • झोप किमान ८-९ तास
  • वर्षातून एकदा Liver Function Test (LFT)
  • Painkiller स्वतःहून घेणं टाळा

लिव्हर आजार हा आता वयाचा नाही… लाईफस्टाईलचा आजार झाला आहे.
आज दुर्लक्ष केलं
तर उद्या मोठी किंमत मोजावी लागेल
त्यामुळे आजच सवयी बदला, लिव्हर वाचवा!