हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) खूप महत्त्वाची झाली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असेल तर आपण सामान्य रोग जसे सर्दी, फ्लू, ताप, वायरल इन्फेक्शन यापासून सुरक्षित राहू शकतो.
रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत असेल तर आपण सामान्य रोग जसे सर्दी, फ्लू, ताप, वायरल इन्फेक्शन यापासून सुरक्षित राहू शकतो.
पण या साठी आपला आहार त्या प्रकारचा असं आवश्यक आहे. त्यामुळे साहजिकच औषधांपेक्षा सोपे उपाय आपल्याला जास्त सुरक्षित आणि फायदेशीर वाटतात.
मात्र, त्यासाठी योग्य जीवनशैली आणि योग्य आहार असणं खूप महत्त्वाचं आहे.
मात्र, त्यासाठी योग्य जीवनशैली आणि योग्य आहार असणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे, आज आपण बघणार आहोत असे काही अन्नपदार्थ जे आपल्या आहारात असतील तर नैसर्गिक रित्या आपली प्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि आपण आजारांपासून दूर राहू.
रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत करणारे अन्नपदार्थ
सफरचंद (Apple)
फायदे:- विटामिन सी आणि फायबरने समृद्ध
- शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढायला मदत
- चवीला उत्कृष्ट त्यामुळे खाण्याची मजा येते
खाण्याची पद्धत : सकाळी नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून खाऊ शकता.
गाजर (Carrot)
फायदे:- बीटा-कॅरोटिनमुळे त्वचा आणि डोळ्यांची काळजी
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
डोळे कोरडे पडतात? डोळ्यांची जळजळ, खाज? दुर्लक्ष केलंत तर मोठा धोका!
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/dry-eyes-problem.html
संत्रा / केळी / पेरू (Citrus Fruits)
फायदे:- उच्च प्रमाणात विटामिन सी
- रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत
लसूण (Garlic)
फायदे:- नैसर्गिक अँटीबायोटिक
- इन्फेक्शनशी लढण्यास मदत
- पदार्थांची लज्जत वाढवते
वय फक्त 25–30… तरी हार्ट अटॅक! कारण ऐकून धक्का बसेल
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/heart-attack-in-early-age.html
पालक (Spinach)
फायदे:- लोह, विटामिन सी, आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध
- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतो
मध (Honey)
फायदे:- नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल
- घशाच्या संसर्गापासून बचाव
- सर्दी, खोकल्यावर गुणकारी
औषधं घेत असूनही साखर वाढते? ही 7 कारणे धक्कादायक आहेत
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-reasons-of-sudden-blood-sugar-spike.html
बदाम, अक्रोड (Nuts)
फायदे:- व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्सने समृद्ध
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यासाठी extra टिप्स
- पुरेशी झोप घेणे - दिवसातून किमान ८-९ तास
- दररोज 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम
- आवश्यक तेवढे पाणी पिणे
- फास्ट फूड, शीतपेय आणि जंक फूड खाणे टाळा
थोडक्यात सांगायचं झालं तर रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यासाठी नैसर्गिक अन्नपदार्थ खाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा साध्या बदलांनी सुद्धा तुमच्या शरीराला रोगांपासून संरक्षण मिळू शकतं.
💬 आपण रोज कोणते immunity boosters खात आहात? Comment मध्ये नक्की सांगा!

0 Comments