तुमचं वय 40 पार झालंय?
तरीही तुम्ही स्वतःला फिट समजता?
👉 पण लक्षात ठेवा – 40 नंतर आजार नकळत शरीरात वाढतात!
म्हणूनच वेळेवर तपासण्या केल्या नाहीत तर
हार्ट अटॅक, डायबिटीस, BP, किडनी, कॅन्सरचा धोका वाढतो 😨
40 नंतर कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत?
ब्लड प्रेशर (BP)
High BP ला Silent Killer म्हणतात? म्हणजे नकळत शरीराची हानी होत राहते.
आणि भविष्यात लक्षणं नसतानाही हार्ट अटॅक येऊ शकतो
👉 त्यामुळे दर 3–6 महिन्यांनी BP ची तपासणी केली पाहिजे
ब्लड शुगर (Fasting + HbA1c)
- Sugar Normal असूनही डायबिटीस असू शकतो
- अनेकदा राहतात शुगर मिळत नाही पण लघवीमध्ये आढळते
- शुगरचा नसांवर, डोळ्यांवर, किडनीवर परिणाम होऊ शकतो
👉 ब्लड शुगर (Fasting + HbA1c) वर्षातून किमान 1 वेळा तपासणी केली पाहिजे
औषधं घेत असूनही साखर वाढते? ही 7 कारणे धक्कादायक आहेत
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-reasons-of-sudden-blood-sugar-spike.html
लिपिड प्रोफाइल (Cholesterol Test)
ही तपासणी शरीरातील खराब कोलेस्टेरॉल चं प्रमाण कळण्यासाठी आवश्यक आहे जे ब्लॉकेज ला करणीभूत ठरतात
यामुळे हार्ट अटॅकचा धोका सम्भवतो
👉 वर्षातून 1 वेळा लिपिड प्रोफाइल तपासणी केली पाहिजे
CBC + हिमोग्लोबिन
थकवा, चक्कर, कमजोरी याचं कारण कळतं
खासकरून महिलांसाठी हे कळणं फार महत्त्वाचं आहे
👉 वर्षातून 1 वेळा CBC + हिमोग्लोबिन तपासणी केली पाहिजे
किडनी फंक्शन टेस्ट (Creatinine, Urea)
किडनी खराब होईपर्यंत लक्षणं दिसत नाहीत
त्यामुळे खासकरून डायबिटीस, BP असेल तर ही तपासणी अनिवार्य आहे
👉 वर्षातून 1 वेळा किडनी फंक्शन टेस्ट केली पाहिजे
लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT)
Fatty Liver चा त्रास 40 नंतर झपाट्याने वाढतो
दारू न पिणाऱ्यांनाही हा त्रास होऊ शकतो
👉 वर्षातून 1 वेळा लिव्हर फंक्शन टेस्ट केली पाहिजे
व्हिटॅमिन D and B12
हाडं दुखणं, केस गळणं, चिडचिड ही व्हिटॅमिन D and B12 च्या कमतरतेची काही लक्षणं आहेत
अनेकांना ४० वयानंतर या दोन्हीची कमतरता निर्माण होते
👉 ही तपासणी डॉक्टर सल्ल्याने केली पाहिजे
डोळ्यांची तपासणी
ग्लुकोमा, रेटिनोपॅथीचा धोका
डायबिटीस असल्यास अत्यावश्यक तपासणी
👉 दर वर्षी 1 वेळा डोळ्यांची तपासणी केली पाहिजे
वय फक्त 25–30… तरी हार्ट अटॅक! कारण ऐकून धक्का बसेल
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/heart-attack-in-early-age.html
कॅन्सर स्क्रीनिंग (खूप महत्त्वाचं!)
- 👨 पुरुषांसाठी: PSA Test (Prostate)
- 👩 महिलांसाठी:
Mammography (Breast)
Pap Smear (Cervical)
👉 डॉक्टर सल्ल्याने ही तपासणी नियमित केली पाहिजे
लक्षात ठेवा
"मला काही त्रास नाही" हे कारण पुरेसं नाही
वेळेवर तपासणी केली तर मोठा खर्च आणि पर्यायाने अनर्थ टळतो
हेल्थ चेकअप म्हणजे खर्च नाही, सुरक्षा आहे!
📢 Strong CTA (Call To Action)
👉 हा लेख 40+ वयाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा

0 Comments