आजकाल आपण अनेकदा ऐकतो —
“तो तर एकदम फिट होता”,
“BP पण नॉर्मल होतं”,
“कसलाही त्रास नव्हता तरी
हार्ट अटॅक आला…”
हा प्रश्न ऐकून प्रत्येकाला धक्का बसतो 😟
मग मनात एकच शंका येते —
👉 BP Normal असूनही खरंच Heart Attack येऊ शकतो का?
उत्तर आहे — होय… आणि येतो!
हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचलात तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य वाचू शकतं ❤️
🩺 BP म्हणजे नेमकं काय?
BP म्हणजे Blood Pressure किंवा रक्तदाब —
रक्तवाहिन्यांमधून रक्त किती
दाबाने वाहतं याचं मोजमाप करण्याचं हे परिमाण आहे.
- Normal BP: 120/80 mmHg
- High BP: 140/90 पेक्षा जास्त
- Low BP: 90/60 पेक्षा कमी
बर्याच लोकांचा असा गैरसमज असतो की —
“BP Normal असेल तर Heart सुरक्षित असतं.”
❌ पण हे पूर्ण सत्य नाही.
💥 Heart Attack म्हणजे काय?
Heart Attack म्हणजे —
हृदयाच्या स्नायूंना जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे.
यामागचं मुख्य कारण असतं —
👉 Coronary Arteries Block होणं म्हणजे म्हणजे
काय रकपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी बंद होणे
⚠️ BP Normal असूनही Heart Attack का येतो?
BP फक्त रक्ताचा दाब सांगतो.
पण Heart Attack चे कारण असते —
- धमन्यामध्ये अडथळा निर्माण होणे
- कोलेस्टेरॉल
- रक्ताच्या गुठळ्या होणे
- जळजळ होणे
- जीवनशैली
आपण आता यांची सविस्तर माहिती घेऊ.
औषधं घेत असूनही साखर वाढते? ही 7 कारणे धक्कादायक आहेत
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/seven-reasons-of-sudden-blood-sugar-spike.html
१) कोलेस्टेरॉल
तुमचं BP १२०/८० असू शकतं जे नॉर्मल धरलं जातं,
पण…
- खराब कोलेस्टेरॉल (LDL) जास्त
- चांगलं कोलेस्टेरॉल (HDL) कमी
- ट्रायग्लिसरॉईड्स म्हणजे रक्तातील चरबी सारखे घटक वाढलेले
यामुळे हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये चरबी जमा होते.
त्यामुळे अचानक —
🩸 रक्ताच्या गाठी तयार होतात
💥 रक्तवाहिन्यांमध्ये
अटकाव निर्माण होतो
➡️ आणि हार्ट अटॅक येतो
2) धूम्रपान – BP Normal पण Artery खराब
सिगारेट, तंबाखू, गुटखा हे प्रकार वरवर प्रभाव दाखवत नाहीत. त्यामुळे BP कधी कधी Normal वाटतं पण
- आतून रक्तवाहिन्या जळत असतात
- रक्त घट्ट होतं
- शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो
👉 अनेक तरुणांमध्ये BP Normal असूनही Heart Attack याच कारणाने होतो.
३) चुकीचा आहार (Junk Food)
हल्ली नुसतं खाणंच नाही तर जेवण सुद्धा —
- पिझ्झा 🍕
- बर्गर 🍔
- तळलेले पदार्थ 🍟
- बेकरीतले पदार्थ 🧁
यामुळे —
- कोलेस्टेरॉल वाढतं
- शरीरातील इन्सुलिन चा उपयोग होत नाही
- जळजळ वाढते
👉 त्यामुळे BP Normal असतं, पण हृदय हळूहळू कमजोर होतं.
४) ताणतणाव
ताणतणाव कुठलाही दृश्य प्रभाव दाखवत नाही पण आतून शरीराची खूप हानी करतो.
- सतत चिंता
- झोप न येणं
- कामाचा ताण
- पैशाचं टेन्शन
यामुळे ताणतणाव निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणून -
- Cortisol hormone वाढतो
- धमन्या आकुंचन पावतात
- रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचा धोका वाढतो
👉 हा ताणतणाव BP मशीनवर दिसत नाही, पण Heart Attack देऊ शकतो.
वय फक्त 25–30… तरी हार्ट अटॅक! कारण ऐकून धक्का बसेल
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/heart-attack-in-early-age.html
५) Diabetes – BP Normal पण धोका दुप्पट
Diabetes असल्यास —
- रकवाहिन्या नाजूक होतात
- नसांचं नुकसान होतं
- त्रास कमी जाणवतो
👉 म्हणूनच अनेक diabetic लोकांना Silent Heart Attack येतो.
६) बैठी जीवनशैली
- दिवसभर बसून काम
- चालणं नाही
- व्यायाम नाही
यामुळे —
- शरीराला रक्तपुरवठा कमी होतो
- वजन वाढ होते
- कोलेस्टेरॉल असंतुलित होतं
👉 त्यामुळे BP Normal असलं तरी हृदय कमजोर होतं.
७) अनुवंशिकता
जर —
- वडील / आईला Heart Attack आला असेल
- वयाच्या 55 आधी घटना घडली असेल
- अचानक मृत्यूची history असेल
तर BP Normal असतानाही धोका 3 पट जास्त असतो.
🚨 BP Normal असूनही Heart Attack ची लक्षणं
ही लक्षणं दुर्लक्ष करू नका 👇
❗ Common Symptoms
- छातीत दडपण / जळजळ
- डाव्या हातात वेदना
- घाम येणे
- मळमळ
- श्वास घ्यायला त्रास
❗ Silent Symptoms (विशेषतः Diabetes मध्ये)
- फक्त थकवा
- छातीत हलकं दुखणं
- Acid सारखी भावना
- झोपेत अस्वस्थता
👉 BP Normal आहे म्हणून ignore करू नका!
🧪 कोणत्या चाचण्या BP व्यतिरिक्त कराव्यात?
फक्त BP चेक पुरेसा नाही ❌
✔️ आवश्यक Tests
- Lipid Profile
- HbA1c / Fasting Sugar
- ECG
- 2D Echo
- TMT (Stress Test)
- CT Coronary Angiography (गरज असल्यास)
👉 वर्षातून एकदा तरी करा.
लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होते का? | सत्य, फायदा आणि योग्य वापर
https://befitwithyoga.blogspot.com/2025/12/does-garlic-reduces-blood-sugar.html
🛡️ Heart Attack पासून बचाव कसा कराल?
🥗 1️⃣ Diet सुधारणा
- कमी तेल
- कमी साखर
- हिरव्या भाज्या
- फळं
- ओमेगा-3 (अळशी, अक्रोड)
🚶♂️ 2️⃣ रोज 30 मिनिटं चालणं
- brisk walk
- योग
- सायकलिंग
😴 3️⃣ झोप
- ८–९ तास
- मोबाईल झोपण्याआधी बंद
🚭 4️⃣ Smoking बंद
हे एक पाऊल Heart साठी सर्वात मोठं gift आहे
😌 5️⃣ Stress Control
- Meditation
- Deep breathing
- वेळेवर सुट्टी
❗ महत्वाचा गैरसमज
मी तर तरुण आहे, BP Normal आहे, मला काही होणार नाही हे विचारच सर्वात धोकादायक आहेत.
आजकाल Heart Attack —
- २५–३५ वयात
- Fit दिसणाऱ्यांनाही
- Gym ला जाणाऱ्यांनाही
येत आहे.
BP Normal असणं म्हणजे Heart Safe असणं नाही.
Heart Attack हा —
- जीवनशैली
- डाएट
- ताणतणाव
- कोलेस्टेरॉल
- अनुवंशिकता
यांचा एकत्र परिणाम आहे.
त्यामुळे आजपासून —
- फक्त BP नाही
- पूर्ण Heart Health कडे लक्ष द्या
Heart Attack येण्याआधी सूचना देत नाही 💔

0 Comments